सूनबाई

फ़रवरी 10, 2007 at 9:29 अपराह्न (स्फुट)

सूनबाई मोठी गुणाची हो!

तिला स्वयंपाक येतो का?  तिला सासरची माणसे आवडतील का? तिला लग्नानंतर मुलंबाळं हवी का? तिला एकत्र कुटुंबात राहायला आवडेल का? या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘नाही माहित’ आम्हाला! तरीही सूनबाई गुणाची कारण ती आमची सून नाही हो, ही सूनबाई आहे बच्चन साहेबांची.

आयुष्याच्या माध्यान्हीला आलेली, आपल्या पोरापेक्षा मोठ्या वयाची, दोन चार पूर्वीची प्रेमप्रकरणे करून पार झालेली, विश्वसुंदरी, जिच्याकडे आपल्या पोरापेक्षा दोन-चार चित्रपट अधिक असतील – हॉलिवूडचे हो! अशी सून बच्चनसाहेबांना चालणार आहे ना, मग आपण कोण तोंडं वेंगाडणारे?

आता बच्चनसाहेब सूनबाईने लग्नानंतरही चित्रपटांत काम करावे असे म्हणताहेत आणि नातवाचे तोंड पाहायलाही उत्सुक आहेत म्हणे.

पण सूनबाई काय म्हणते? ती काय म्हणणार? गुणाची ना ती! सूनबाई हल्ली लाजून हळूच खाली बघते ही अशी.

फोटो www.bbc.co.uk च्या सौजन्याने

परमालिंक 1 टिप्पणी

पिंगट केसांची बया

फ़रवरी 9, 2007 at 1:52 अपराह्न (स्फुट)

ऍना निकोल स्मिथच्या अकस्मिक मृत्यूमुळे कित्येक जीव हळहळले असतील. तिच्यातील आणि मेरलिनमधील साम्य, प्लेबॉयच्या मध्यपानावरील तिच्या मादक अदा, तिचे ते बालीश लडिवाळ बोलणे आणि इतरांची नजर आपल्या कोणत्या शरीरसौष्ठवावर खिळून राहिल याची घेतलेली पुरेपुर काळजी यासर्वांना अनेक रसिकांना मुकावे लागणार आहे.

आमच्या देशात कोणाचा मृत्यू झाला तर त्याबद्दल खोट्टे खोट्टे का होईना पण बरे बोलण्याची प्रथा आहे. अमेरिकेत ती तशी नाही असं म्हणता येणार नाही पण फारशी नाहीच. तेव्हा काल ऍनाच्या लहान पोरीचे काय होणार, तिचा बाप कोण, पहिल्या नवर्‍याच्या इस्टेटीतील हिस्सा तिला मिळणार का? ते तिचा वकिल आणि तथाकथित नवरा तिला इतरांना कसा पुरवत होता या चर्चांना भारीच उधाण आलेले आहे.

आमची प्रतिक्रिया: पुरुषांच्या जीवनातून डोळे खिळून राहतील असे काहीतरी मोठ्ठे पाहण्याची एक संधी गेली.  😀

परमालिंक टिप्पणी करे

पंचाईत

फ़रवरी 8, 2007 at 9:14 अपराह्न (स्फुट)

आताशा म्हणे बर्‍याच मनोगतींची पंचाईत झाली आहे. त्यांना कोणी वालीच उरलेला नाही.  त्यांची प्रतिभा गायब होण्याच्या मार्गावर आहे म्हणून प्रत्येकाने आपापला ब्लॉग टाकला आहे.

आम्हाला एक कळत नाही. “वाहवा! भले शाब्बास!” अश्या प्रतिसादांसाठी लेखन करण्याची सवय झालेल्या निदान काहीजणांनातरी (कृपया, या काहीजणांची संख्या विचारू नये. 😉 ) हे ब्लॉगविश्व कसे बरे रुचणार?

असो. आम्हाला कशाला नसती पंचाईत? 🙂

परमालिंक टिप्पणी करे

« Previous page