आय हिक्क!
“आय हिक्क!…… आय हिक्क!” बबन्याच्या उचक्यांना उधाण आले होते.
“आरं! पानी पी की तांब्याभर, किती उचकी लागलीया?” बायजा कावून म्हणाली.
“आये! पानी प्यालं की गं, पन ही उचकी लई भारी दिसतीया, जायचं नावच काढीना. आय..हिक्क!”
“उचकी हाय. ती कायमची न्हाय राहायची… यील सतवील आनी जायील गुमान.”
“आगं आये! तुला काय म्हाईत न्हाई बगं! ही उचकी जानार्यातली न्हाई. ती हितंच असतीया, अदनंमदनं तिला उबळ येतीया…आय हिक्क!… ही अश्शी.”
“जानार्यातली न्हाई, हितचं असतीया, म्हंजी काय रं बबन्या? आसं येड्यावानी काय बोलतुया?” एव्हाना बायज्जाक्काला काळजी वाटायला लागली.
“आगं! येड्यावानी न्हाई आये. हा उचकी हितंच असतुया, अजीर्न झालं की आय..हिक्क म्हनत भायर पडतुया.”
” बबन्या तुजं काय खरं न्हाय… हा उचकी? आरं उचकी बाईवानी असतीया. ही उचकी म्हनतात.”
“आये सांगितलं ना तुला… ह्ये उचकी प्रकरन जंक्शन हाय. हा की ही त्येच कळेनासं झालंय…. ह्या उचकीचा माग लागत न्हाई तोवर आय…हिक्क ‘चांगभलं!! सदानंदाचा येळकोट!’ आसं म्हनायचं आनि गप्पगुमान राहायचं इतकच आपल्या हातात हाय….. आय हिक्क!”
“आरं माज्या कर्मा काय बोलतुस रं लेका? सकाळच्या पारी काय तरी वंगाळ पिऊन न्हाईना आलास?” पोरगा काय बोलतोय ते बायजाच्या डोक्यावरून जात होते.
बबन्या गालात हसला. काहीतरी बोलायला म्हणून त्याने तोंड उघडलं तशी पुन्हा उचकी आली.
“आय…हिक्क!”
yogesh said,
जून 24, 2007 at 1:46 अपराह्न
jabari nirikShan aahe. 🙂
techmilind said,
जून 25, 2007 at 6:12 अपराह्न
ह्ये उचकी प्रकरन जंक्शन हाय. हा की ही त्येच कळेनासं झालंय…. ह्या उचकीचा माग लागत न्हाई तोवर आय…हिक्क ‘चांगभलं!! सदानंदाचा येळकोट!’ आसं म्हनायचं आनि गप्पगुमान राहायचं इतकच आपल्या हातात हाय….. आय हिक्क!”
खल्लास !
लगे रहो !
– मिलिंद
deepanjali said,
सितम्बर 3, 2007 at 1:14 अपराह्न
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर