भिंत देता का भिंत

जून 4, 2007 at 12:53 अपराह्न (टवाळकी)

आजच्या लोकसत्तेत एक बातमी वाचली –  दीवार मधील अमिताभच्या तोंडचा संवाद “साब पैसे उठाकर हातमें दीजीये, मैं फेके हुए पैसे नहीं उठाता।” हे चक्क सातवीच्या समाजशास्त्र आणि राजकीय जीवन या विषयाच्या पुस्तकात छायाचित्रासकट टाकले आहे. हे वाचून आम्ही धन्य झालो. इतर चित्रपटांच्याबाबतीत आपपरभाव होतो आहे की काय अशी शंका आमच्या पापी मनाला चाटून गेली. आमचे काही आवडते संवाद कोणत्या विषयांत चपखल बसतील ते पाहा –

१. चिनायसेठ, जिनके खुदके घर शीशेके होते है वोह दुसरोंपर पत्थर फेंका नहीं करते। – भौतिकशास्त्र.

२. जबतक बैठने को ना कहा जाये खडे रहो। ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बापका घर नहीं। – नागरिकशास्त्र.

३. कितने आदमी थे? सरकार २। वो दो थे और तुम तीन…. सोडवा गणित. 😉

४. एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते। – रसायनशास्त्र.

५. ये हाथ मुझे दे दे ठाकूर। – कार्यानुभव.

६. मैं तुम्हारे बच्चेकी मॉं बननेवाली हूँ। – जीवशास्त्र.

यांनाही कोठेतरी स्थान द्या हो. आवडतात आम्हाला हे संवाद.

तुमच्याकडे असे संवाद विषयांसकट असतील तर कळावे,

आपला,
बेधडक डोईफोडे.
(नाहीतर मग भिंत देता का भिंत असे कशाला मागत होतो? डोके फोडून घ्यायलाच की.)

4 टिप्पणियां

  1. Meghana Bhuskute said,

    Zakas! Sakali sakali mipan hech wichar karat hote. Monday morning susahya zali!

  2. yogesh said,

    सही… 🙂 आम्हीही अशा संवादांवर विचार करत आहोत.

    सहज सुचलेले काही संवाद.

    १. तू भगवान नही सिर्फ एक पत्थर की मूर्ती है – शिल्पकला
    २. गरीबोंके सपने सच नही हुआ करते – अर्थशास्त्र
    ३. यह सौ किलो का हाथ जब भी किसी के उपर पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है – अप्लाईड मेकॅनिक्स

  3. Omkar said,

    बराचसे लेख वाचले… फारच छान…!! मजा आली… अधिक लिखाणासाठी शुभेच्छा..!

  4. Archana said,

    hi hi hi hi hi hi hi hi. saheeeeee!

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: