आजचे राशिभविष्य

फ़रवरी 26, 2007 at 12:19 पूर्वाह्न (फालतू विनोद)

आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये हे भविष्य वाचले. हे भविष्य इतके बोगस असते तरीही लोक आवडीने ते वाचतात असा अनुभव आहे. नुसते वाचतच नाहीत तर आपापल्यापरीने त्याचा बादरायण अर्थ, संबंधही जोडून घेतात, हा असा —


मेष : धाडसाने काम
आज बायकोला नक्की सांगणार की तुझ्या स्वयंपाकाला माझ्या आईच्या हातची चव मुळीच नाही.

वृषभ : आथिर्क लाभ
बाबांना पॉकेटमनीसाठी पुन्हा गंडवलं. 😉

मिथुन : नवीन कपडे घ्याल.
नवी जीन्स पाहून ठेवली आहे. कात्रीने ढोपरावर आणि मांड्यांवर कापली तर झ्याक दिसेन मी.

कर्क : खर्च वाढेल.
मी या जीन्स विकत घेणार्‍या पोरीचा बाबा. 😦

सिंह : मित्र भेटेल
हम्म! कोण येणार आहे आज गळ्यात पडायला? की मलाच कोणाला तरी कापायला हवं?

कन्या : बढतीचा योग
कालच शेजारच्या इमारतीतल्या संजनाचा फोन होता, “मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ।”

तूळ : पोटाची काळजी घ्या.
 संजनाची रास

वृश्चिक : उगाच चिंता
सांग सांग भोलानाथ, राज-उद्धवाची बनेल काय?

धनु : कौटुंबिक सुख
बायको पोरांना घेऊन माहेरी गेली आहे.

मकर : उत्साहाने काम
बाजूच्या वेंकटच्या इमेलचा पासवर्ड सापडला.

कुंभ : उपासनेत व्यत्यय
आत्ता बाटली ओपन केली आणि कोण उपटलं यावेळी?

मीन : विरोधकांचा त्रास
आमच्या अनुदिनीला प्रतिसाद न येण्याचे मुख्य कारण.

आपला (फलज्योतिषी),
बेधडक.

4 टिप्पणियां

 1. anu said,

  jabardast!!
  Sakali sakali hasale.

 2. yogesh said,

  tumhi pan vachata vatata 🙂

 3. bedhadak said,

  धन्यवाद अनुताई, तुमच्या तुलनेत आम्ही शिकाऊ तट्टू आहोत, पण तुम्ही सकाळी हसलात म्हणजे पुढचा दिवस बरा जाईल असे भविष्य आम्ही वर्तवतो आणि त्याबद्दल पुन्हा धन्यवाद.

  अरे योगेश! म्हणजे काय? रोजच्या रोज वाचतो आणि हे असे अर्थही काढतो. डोक्याला खाद्य नको का?

 4. bhagyashree said,

  ह.ह.पो.दु. 😀 हा ही लेख खूप आवडला !
  (फार हसु येतय म्हणून सगळीकडेच हा ही झाले कि काय! 🙂 )

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: