तिसरे पान

फ़रवरी 22, 2007 at 11:59 अपराह्न (टवाळकी)

हे तिसरे पान म्हणजे एक अजब प्रकार असतो. यापानावर काय काय वाचायला मिळेल आणि काय काय बघायला मिळेल याची कल्पना साक्षात ब्रह्मदेवालादेखिल करता येणार नाही. या पानावर ज्यांची चित्रे झळकतात, बातम्या झळकतात ते मनुष्यप्राणी आपल्या पोटापाण्यासाठी नक्की काय करतात हे अद्याप आम्हाला समजलेले नाही.

कळले आहे ते इतकेच की सर्व समारंभांना, पार्ट्यांना या मंडळींची वर्णी अत्यावश्यक असते. केसांच्या आणि कपड्यांच्या झिंज्या, एकमेकांशी झोंबाझोंबी करताना काढलेली प्रकाशचित्रे आणि काहीतरी अर्तक्य सनसनाटी बातम्या यांनी हे पान भरलेले असते.  गेल्या काही दिवसांतील लक्षात राहिलेल्या बातम्या पुढीलप्रमाणे —

 1.  ब्रिटनी स्पिअर्सचे टक्कल
 2. संजूची मान्यता
 3. बिपाशा आणि जॉनचे नवे भांडण
 4. सलमानची जुनी गर्लफ्रेंड
 5. ऍना निकोल स्मिथच्या मुलीचा नवा बाप
 6. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा मुहुर्त
 7. मॉडेल १ आणि मॉडेल ४ चे मॉडेल २ आणि मॉडेल ८ शी भांडण आणि समझौता.**
 8. एकता कपूर यांची क च्या बाराखडीतील नवी मालिका
 9. शाहरूख पुत्र करणला मावशी म्हणतो की रितुपर्णोला?
 10. शोभा डे मराठीत बोलल्या.

 हाय रे आमच्या कर्मा!

 ** त्या मॉडेल्सची नावे कोणाच्या लक्षात राहत असतील तर कृपया कळवा.

आपला (त्रिदळ),
बेधडक
 

6 टिप्पणियां

 1. Shailesh S. Khandekar said,

  हा हा हा, 🙂 अगदी चुरचुरीत लेखन आहे. मस्तच!

 2. yogesh said,

  abhishek aishwarayachya lagnacha muhurta hi pahilya panavarahi batami aahe. 😀

 3. bedhadak said,

  धन्यवाद शैलेश.

  योगेश, तिसर्‍या पानावर मुहूर्त आज की उद्या, २९ तारखेला की फेब्रुवारीच्या ३० तारखेला 😉 अशा गरमागरम बातम्या असाव्यात.

  खरी बातमी पहिल्या पानावरच येणार काळजी नको, त्या ABC वाहिनीचे काय झाले?

 4. yogesh said,

  एबीसी वाहिनी चालू आहे… पण बरेच दिवस काही एक्सायटिंग बातमी आली नाही बिगबी कडून… त्यामुळे सध्या तिच्यावर पण पेज-३ कार्यक्रमच चालू आहेत 😉

 5. armoks said,

  Majaa aali vachoon. Asa kahi vachalaa tar kharach bara vatta….

 6. bedhadak said,

  wa wa! chalu de yogesh… Big B la news madhye rahilyashiway karamanaar thodech.

  dhanyawad armoks!

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: