कॉफी मशिन

February 13, 2007 at 3:13 pm (स्फुट)

आमचे वय काही फार नाही. स्वत:चा आदरार्थी उल्लेख केला की बरेचजण आम्हाला बाबा आदमच्या काळातला एखादा बुवा समजत असावेत. फारसे काही माहित नसताना कल्पनेचे किल्ले लढवायची भारी वाईट खोड असते लोकांना त्याला काय करणार “आम्ही”!!

अभी तो मैं जवाँ हूँ।
दो चार बच्चोंका बाप हूँ।

हम्म! तर सांगणे जैसी बात म्हणजे आमचा मोठमोठी हापिसे आणि इतर धंद्यांच्या ठिकाणी कॉफी यंत्रे बसवण्याचा धंदा आहे आणि आम्ही तो इमानेइतबारे करतो, धंद्यात बरकतही आहे. आता परवा बर्‍याच वर्षांनी एक मित्र भेटला आणि आम्हाला ‘काय करता आजकाल?’ असा महत्वाचा प्रश्न विचारून गेला. आम्ही त्याला आमच्या नव्या धंद्याबद्दल सांगितले तसा म्हणाला, “लेका! मला अद्याप एकाही पोरीला कॉफी पाजता नाही आली आणि तू आख्ख्या ऑफिसला कॉफी पाजतोस?”

आता हल्लीच्या स्लँगमध्ये ‘कॉफी पाजण्याला’ जर विचित्र अर्थ असेल तर मग आमचा धंदा ….. नको पुढचे वाक्य प्रशस्त नाही.

लोक आपल्याला हवे ते अर्थ काढतात आणि आमच्यासारख्या सज्जन ;) माणसाची पंचाईत करतात हेच खरे!

Post a Comment